घनशेत करिअर अकॅडमी

🏠 होमपेजवर जा

आमच्या विषयी

सोबतीने शिक्षण, सोबतीने यश

कोरोनाचा तो काळ आजही आठवला की अंगावर काटा येतो. सर्व जग ठप्प झाले होते, भविष्य अंधारात वाटत होते. पण म्हणतात ना, "रात्र जेवढी गडद असते, पहाट तेवढीच जवळ असते." त्याच काळात आपल्या घनशेत गावात बदलाचे एक सोनेरी पान लिहिले जात होते.
​सगळं जग थांबलेलं असताना सतीश गावितने गावात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे एक छोटेसे बी पेरले. त्या विचाराला मनोज सिताड, जीवन चौधरी, भगीरथ टोपले आणि दामोदर टोपले या तरुणांनी खतपाणी घातले आणि बघता बघता त्या रोपट्याचा वटवृक्ष व्हायला सुरुवात झाली.
​हा केवळ अभ्यास नव्हता, तर गावाची दिशा बदलणारा एक लोकयज्ञ होता. लक्ष्मण आप्पा आणि कमलाकर भाऊ यांनी पुढाकार घेऊन फंड उभारणी सुरू केली आणि आम्ही सगळे एका विश्वासाने या प्रवाहात जोडले गेलो. हिरकूड सरांसारखे स्थानिक शिक्षक आणि गावात पूर्वी सेवा देऊन गेलेले अनेक आदरणीय गुरुजन या कार्यात पाठीशी उभे राहिले. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) गाव दत्तक घेतल्यानंतर मोरे साहेबांचीही मोलाची साथ लाभली.
​'मुलांनी मुलांसाठी सुरू केलेली' ही आपल्या तालुक्यातीलच नव्हे, तर बहुदा संपूर्ण जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव चळवळ ठरली. ग्रामपंचायतीच्या एका छोट्याशा १० बाय १० च्या खोलीतून सुरू झालेला हा प्रवास आज स्वतःच्या सुसज्ज इमारतीत दिमाखात पोहोचला आहे.
​सतीशकडून जीवन, जीवनकडून मनोज, मनोजकडून भगीरथ आणि आता खुशाल... नेतृत्वाची ही मशाल अशीच एका हातातून दुसऱ्या हातात यशस्वीपणे पुढे जात आहे. आज ५ वर्षांहून अधिक काळात तब्बल ३० पेक्षा जास्त मुलांनी यशाला गवसणी घातली आहे.
​ज्या संकटाने अनेकांना हताश केले, त्याच संकटावर मात करून घनशेतच्या तरुणाईने स्वतःचे आणि गावाचे भविष्य घडवले. 'एकला चलो रे' ऐवजी सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या सतीशच्या भूमिकेला आणि या प्रवासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ देणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाला, शिक्षकाला, संस्था आणि ग्रामपंचायतीला सलाम.
​आज ही अकॅडमी केवळ एक वास्तू राहिलेली नाही, तर घनशेतची ओळख आणि अभिमान झाली आहे
घनशेत करिअर अकॅडमी

सुविधा

पत्ता व संपर्क

घनशेत ता पेठ जि नाशिक

📞 7264020174 / 9158488178

Google Map वर पहा ↗

वेळ

सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत

आभार

खालील संस्थांनी अकॅडमीला मोलाची मदत केली. त्यांचे मनःपूर्वक आभार!

यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक

पुस्तके , संगणक , विविध प्रशिक्षणे